Polio Vaccination  esakal
महाराष्ट्र बातम्या

Polio Vaccination : राज्यात एक कोटीहून बालकांना पोलिओ डोस; 89 हजार 299 बुथची उभारणी

Polio Vaccination : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज (ता. ३) पाच वर्षाखालील १ कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रशांत बैरागी -सकाळ वृत्तसेवा

Polio Vaccination : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज (ता. ३) पाच वर्षाखालील १ कोटी १३ लाख ७० हजार ४४३ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ ही यंदाच्या पल्स पोलिओ मोहिमेची टॅग लाईन आहे. ()

नागरिकांनी अफवा, अंधश्रद्धेला बळी न पडता बालकांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्‍चित केल्यानंतर राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबवण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

गेली २५ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्व जण योगदान देत आहेत. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यात ३ मार्चला ग्रामीण व शहरी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार आहे. राज्यभरात ८९ हजार २९९ बूथ उभारण्यात आले असून, सुमारे २ लाख २१ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी या बुथवर कार्यरत असतील. (latest marathi news)

याशिवाय तीन कोटींपेक्षा अधिक घरांना मोहिमेअंतर्गत भेट दिली जाणार आहे. एकही बालक वंचित राहू नये, यासाठी फिरती पथके आणि रात्रीची पथकेही कार्यरत असणार आहेत.जिल्हा स्तराप्रमाणेच तालुका आणि ग्रामीण स्तरावरही लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने या लसीकरण मोहिमेसाठी आपली यंत्रणा सज्ज केली असून जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

पॉईंटर

- २५ वर्षांपासून मोहिम सुरु

- ८९ हजार २९९ बूथ

- २ लाख २१ हजार कर्मचारी नियुक्त

- १ कोटी १३ लाख बालकांचे उद्दीष्ट

गृहभेटीदरम्यान डोस देण्याचे नियोजन

पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस न घेऊ शकणाऱ्या वंचित बालकांना गृहभेटीदरम्यान पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य विभागासोबतच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ युएसएड, लायन्स क्लब रोटरी क्लब व स्वयंसेवी संस्था तसेच बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचा सहभाग असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission PC : राहुल गांधींना शपथपत्र देण्यास का सांगण्यात आलं? निवडणूक आयोगाने सांगितलं कारण...

Mother’s Milk Benefits: जन्मल्यानंतर बाळाला आईचं दूध का गरजेचं आहे? तज्ज्ञ सांगतात कारणं

Explainer : काय आहे ‘विकसित भारत रोजगार योजना’? प्रत्येक तरुणाला मिळणार १५ हजार रुपये, अर्ज कसा कराल? वाचा A टु Z माहिती

Ahilyanagar News: 'खासदार निलेश लंके वाहतूक कोंडी साेडवण्यासाठी उतरले रस्त्यावर'; अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर वाहनांची गर्दी

दुहेरी हत्याकांडानं बदायूं हादरलं! जमिनीच्या वादातून आई-मुलीची चाकूने भोसकून हत्या; घराबाहेर झोपलेल्या भावावरही हल्ला, मध्यरात्री काय घडलं?

SCROLL FOR NEXT