vida.jpg 
महाराष्ट्र बातम्या

विविध पानांची चव पुरवतेय नाशिककरांच्या जिभेचे चोचले!

किशोरी वाघ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भरपेट जेवण केल्यानंतर पान खाल्ल्याशिवाय अनेकांना पान खाण्याची सवय असते. शहरातील चौका चौकात, नाक्‍यावर, महाविद्यालयीन परिसरात पानाचे अनेक स्टॉल हमखास दिसतातच. गेल्या काही वर्षांत तंबाखु, कलकत्ता, मघई, मसाला यांसारख्या पानांहून विविध फ्लेव्हरच्या पानांना ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. चॉकलेट, अननस, आंबा, संत्री, बटरस्कॉच, स्ट्रबेरी, पेरू, सुगंधी पान यांसारखे अनेक प्रकारच्या पानांची चव शहरवासीयांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. 

कलकत्ता-मघईपेक्षा चॉकलेट, अननस, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी सारख्या विविध चवीचे पान सरस 

काही ठिकाणी तर नैसर्गिक वस्तू वापरूनच आरोग्यासाठी आवश्‍यक अशा प्रकारे बनवले जात असून, महाराष्ट्रात मोठमोठ्या शहरात नाशिकचे पान जाऊन तिथल्या लोकांना चाहते बनवत आहे. पूर्वी फक्त तंबाखू पान असायचे त्यामुळे पान खाणाऱ्याचे प्रमाण कमी होते परंतु, आता वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने पान खाणाऱ्याची संख्या अधिक दिसून येते. काही लोकांना पान जीव की प्राण असते मात्र, मधुमेहामुळे कोणतीही मनात शंका न आणता ते खास मधूमेह लोकांना जे घटक आहारात हवे ते टाकून चविष्ट विड्याचा आंनद घेत आहे. यासह खास बाळंत विडा देखील बघायला मिळतो जो गरोदरपणात स्त्री ने खाल्यास तिच्या व तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी गुणकारी असते असे म्हंटले जाते. छोट्या पान स्टॉलवर दिवसाला शंभरपेक्षा जास्त तर मोठ्या पान दुकानात तीनशे ते चारशे पानांची विक्री होत असल्याचं विक्रेत्यांकडून सांगितले जाते आहे. यात, 20 ते 30 वयोगटातील तरुण तरुणीकडून चॉकलेटसह, बटरस्कॉच, फायर पान, मॅंगो पानाला अधिक पसंती मिळते आहे. 

प्रतिक्रिया
कलकत्ता व मघई या पानापेक्षा इतर फ्लेवरच्या पानांना मागणी जास्त आहे. लोक फॅमिली सोबत हॉटेलमध्ये जेवण करायला आल्यानंतर हमखास पान खायला येतातच. तसेच, पुरुषाप्रमाणेच महिलाकडून देखील फ्लेवर पानांची मागणी होत आहे. - प्रवीण आंधळे, पान विक्रेते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : 'मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब'; भाजप आमदाराचं स्फोटक वक्तव्य, केनेकरांना जरांगे देणार प्रत्युत्तर?

Jagdeep Dhankhar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड पुन्हा चर्चेत! 'या' कारणामुळे केला सरकारकडे अर्ज

Tharal Tar Mag : अर्जुनच्या हाती लागणार सायलीचं तन्वी असल्याचा पुरावा ? प्रोमो बघून प्रेक्षक म्हणाले..

Jio Frames : जिओने केला धमाका! लॉन्च केला AI वाला चश्मा, एका क्लिकवर फोटो, व्हिडिओ अन् कॉलिंगसुद्धा; किंमत फक्त...

'मराठा आरक्षण देण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते'; सात दिवसांत आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात

SCROLL FOR NEXT