Audio clip of Navneet Rana goes viral Audio clip of Navneet Rana goes viral
महाराष्ट्र बातम्या

नवनीत राणांची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘मला विचारून लफडा केला का?

आता हे प्रकरण कोणे वळण घेणार, हे नवनीत राणांच्या उत्तरानंतर कळणार आहे

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधणे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका असो. राणा यांची नेहमीच चर्चा होते. आताही त्या चर्चेत आल्या आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह संभाषणाच्या ऑडियोमुळे (Audio clip). या संभाषणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाने नोटीस (State Womens Commission) बजावून खुलासा मागितला आहे, हे विशेष... (Audio clip of Navneet Rana goes viral)

युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्याने आपली फसवणूक केल्याची तक्रार महिलेने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याकडे केली होती. त्यासाठी त्यांनी खासदार राणा यांना फोन करून माहिती दिली व पदाधिकाऱ्याला समज द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, नवनीत राणा यांनी महिलेची उलट तपासणी करीत ‘तुम्ही मला विचारून लफडा केला का’ असा उलट प्रश्न विचारला.

नवनीत राणा (Navneet Rana) यांनी कैफियत ऐकून घेतली नाही म्हणून महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य महिला (State Womens Commission) आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तक्रारीची दखल घेत खासदार राणा यांना नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. आता हे प्रकरण कोणे वळण घेणार, हे नवनीत राणांच्या उत्तरानंतर कळणार आहे.

नवनीत राणा अडचणीत येणार?

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप (Audio clip) सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. खासदार या नात्याने त्यांच्या भागातील पीडितांनी किंवा महिलांनी त्यांच्याकडून अपेक्षा करू नये का, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. आपल्या बेधडक आणि रोखठोक वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवनीत राणा या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT