pregnant mothers died  esakal
महाराष्ट्र बातम्या

नवनीत राणा यांच्या मतदारसंघात 110 बालकांचा मृत्यू, 2 गरोदर मातांनी सोडले प्राण

दरवर्षी सुमारे 200 ते 300 बालके मृत्यूच्या दारात ढकलली जात आहे

सकाळ डिजिटल टीम

कुपोषण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्‍य शासनाकडून जननी-शिशू सुरक्षा योजना, ग्राम बालविकास केंद्रे, जीवनसत्त्वपुरवठा, जंतनाशक मोहीम, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र, भरारी पथक योजना, लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अशा डझनांहून अधिक योजना अस्तित्वात असताना मेळघाटात दरवर्षी सुमारे 200 ते 300 बालके मृत्यूच्या दारात ढकलली जात आहे.

कुपोषण पाचवीला पुजलेल्या मेळघाटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कुपोषणामुळे मेळघाटमध्ये गेल्या 5 महिन्याच्या काळात 110 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मेळघाटमध्ये कुपोषणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही. तर दिवसेंदिवस बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालल्याचे भीषण परिस्थीती समोर आली आहे. मागील पाच महिन्यात 110 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवनीत राणायांच्या मतदार संघातील ही घटना असून, विशेष म्हणजे एकट्या धारणी उपजिल्हा रुग्णालयात 36 पैकी 19 बालकांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 110 बालकांपैकी शून्य ते सहा महिने या वयोगटातील 77 बालकांचा समावेश आहे. तर 33 बालक हे मृतावस्थेत जन्माला आले होते. सोबतच दोन गरोदर मातांचा ही यात मृत्यू झाला आहे. ही माहिती आरोग्य विभागाच्याच आकडेवारीत समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पुन्हा पोलिस आणि आंदोलक समोरासमोर

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT