navneet rana ravi rana 
महाराष्ट्र बातम्या

हनुमानाचं खरं नाव काय? प्रश्न विचारताच नवनीत राणांची 'बोबडी वळली'

सकाळ डिजिटल टीम

राजद्रोहाच्या खटल्यात जामीन मंजूर झाल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून थेट दिल्लीची वाट धरली. दिल्लीत त्यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. याचसोबत काही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर राणा दिल्लीतच ठाण मांडून होत्या. उद्धव ठाकरे यांच्या सभेआधीच त्यांनी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केलं. (Navneet Rana in Delhi)

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दिल्लीत जाऊन ठाकरे सरकारविरोधात तोफ डागली. दिल्लीतल्या कनॉट प्लेस परिसरातल्या हनुमान मंदिरात राणांनी महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्तेही होते. राणांनी उद्धव ठाकरे यांची सभा सुरू होण्याआधीच शिवसैनिकांना पुन्हा डिवचलं होतं. (Navneet Rana Hanuman Chalisa Row)

यानंतर राणांनी दिल्लीतील काही माध्यमांना मुलाखत दिली. टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राणांना भगवान हनुमानाचं खरं नाव काय होतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणांना उत्तर देता आलं नाही. तसेच प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शेअर करत मिश्किल हास्य केलं आहे.

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारच्या काळात भ्रष्टाचार सुरू असून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याची टीका राणा दाम्पत्यानी केली होती. ठाकरे सरकारला काम करण्याची सुबुद्धी मिळो आणि राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागो, यासाठी नवनीत राणांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास केला. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेरच हा कार्यक्रम करणार असल्याचं जाहीर केलं.

नेटकऱ्यांनी राणांना टोले लगावण्यास सुरुवात केलीय.

यानंतर राज्यात नव्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली. शिवसेना विरुद्ध राणा आणि त्यानंतर किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावतीने भाजपने संपूर्ण प्रकरणात अधिकृत एन्ट्री घेतली. राज्यातील सर्व प्रश्न हनुमान चालिसा पठण केल्याने सुटतील, असा दावा राणांनी केला.

काही काळाने भाजपने याला पाठिंबा दिल्याचं दिसलं. राणांनी दिल्लीत जाऊन भेटीगाठीही घेतल्या. पण मुलाखतीत विचाललेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही. त्यामुळे आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धारेवर धरलंय. काही नेटकऱ्यांनीही राणा दाम्पत्याला टोले लगावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT