Sanjay Raut Navneet Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देताय?; राणा राऊतांवर बरसल्या

शिंदे गटाला 'खरे शिवसैनिक' म्हणत नवनीत राणा राऊतांवर संतापल्या

सकाळ डिजिटल टीम

बंडखोर आमदारांविरोधात आता शिवसेनेतलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या पोस्टर्सला काळं फासलं आहे, तसंच अनेक ठिकाणी आमदारांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. अशातच संजय राऊतांच्या एका विधानाने गोंधळ माजला आहे.संजय राऊतांच्या या विधानानंतर खासदार नवनीत राणाही संतापल्या आहेत. (Navneet Rana angry on Sanjay Raut statement)

काय आहे हे विधान?

आमच्या कुटुंबियांची जबाबदारी राज्य सरकारची आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत मांडली होती. त्यानंतर संजय राऊत म्हणाले होते की, सुरक्षा महाराष्ट्रातच सोडून ढुंगणाला पाय लावून पळालेल्यांना आम्ही संरक्षण देणार नाही. आमदारांना संरक्षण असतं, त्यांच्या कुटुंबियांना नसतं. यावरुनच आता टीकेची राळ उठली आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

"संजय राऊतांनी विधान केलं. एकनाथ शिंदे गटात जी मूळ शिवसेना आहे, बाळासाहेबांसोबत ज्यांनी काम केलं ते एकनाथ शिंदे आणि जे खरे शिवसैनिक आहेत, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंसाठी काम केलेलं आहे, लोकांचं प्रतिनिधित्व केलं. आज ते गट उद्धव ठाकरेंपासून बाजूला गेले आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी बाजूला जाऊन सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेंचे सैनिक नाही, बाळासाहेबांचे सैनिक आहोत. पण हे पाहताना सत्ता लांब जातेय म्हणून उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत जे गुंड अडीच वर्षांपासून तयार केले आहेत, त्यांचा वापर ते आता करतायत. तीच भाषा आज संजय राऊत खासदार असताना, जबाबदार व्यक्ती असताना म्हणतायत की आमदारांना संरक्षण आहे, त्यांच्या कुटुंबियांना नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे संजय राऊतजी? की आपण त्यांच्या परिवारांना मारताय , परत नाही आला त्यांच्या परिवाराला मारण्याची सरळसरळ धमकी तुम्ही देताय"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला नवा संघ मिळाला... मुळ किंमतीच्या पाचपट रक्कम; शिवम दुबेसह आता धुमाकूळ घालणार भाई...

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

SCROLL FOR NEXT