Uddhav Thcakeray, Navneet Rana, Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

मागच्या सरकारमुळे प्रकल्प हातचा गेला; नवनीत राणांकडून शिंदे सरकारची पाठराखण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर सारवासारव करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती दिली. या वादात आता खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारची पाठराखण केली आहे. (Navneet Rana news in Marathi)

नवनीत राणा म्हणाल्या की, मागच्या सरकारने पाठपुरावा न केल्याने प्रकल्प गुजरातला गेला. एवढा मोठा प्रोजेक्ट इथे आणण्यासाठी प्रपोजल असतो, त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा आधीच्या सरकारने केला नाही. वेळेत पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला असून हा आमच्या सर्वांसाठी धक्का आहे. मागच्या सरकारमुळेच हा प्रकल्प येथून तिथं हलवण्यात आल्याचंही नवनीत राणा यांनी म्हटलं. राणा यांनी अप्रत्यक्षरित्या विद्यमान एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारची पाठराखणच केली आहे.

दरम्यान या प्रकल्पासंदर्भात सामंत म्हणाले होते की, दोन महिन्यात प्रकल्प गुजरातला जावू शकत नाही. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये मुख्यमंत्री स्पष्ट म्हणताना दिसतात की, वेदांता प्रकल्प लवकरच महाराष्ट्रात येत आहे. केवळ २१ दिवसांपूर्वी त्यांनी हे विधान केलं होतं. अर्थात त्यांच्या या विधानामुळे वेदांता प्रकल्प २१ दिवसांतच गुजरातला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंची घोषणा खरी होती की, उद्योगमंत्री सामंत खरं बोलतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT