Navratri 2022 Vishva Hindu Parishad demand allow entry to garba festival after verifying aadhaar card
Navratri 2022 Vishva Hindu Parishad demand allow entry to garba festival after verifying aadhaar card  esakal
महाराष्ट्र

Navratri 2022 : 'गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच... '; विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी

सकाळ डिजिटल टीम

आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. नवरात्रीमध्ये गरबा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या गरबा उत्सवासंदर्भात विश्व हिंदू परिषदेनं एक मोठी मागणी केली आहे. गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला प्रवेश द्या असं विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं आहे. (Navratri 2022 Vishva Hindu Parishad demand allow entry to garba festival after verifying aadhaar card )

गरबा हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय असून सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश द्याआणि त्यासाठी आधार कार्ड तपासा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.

गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आत्ताच काळजी घेतलेली बरी असा उद्देश विश्व हिंदू परिषदेचा या मागणी मागचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने विदर्भात अनेक ठिकाणी गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांची भेट घेतली आहे, तर पोलीस अधिकाऱ्यांशी भेटणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिली आहे.

गरज भासल्यास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते गरबा उत्सव आयोजन स्थळे उभे राहून मंडळांना मदत करतील, आयोजन मंडळ आणि पोलिसांनी यात पुढाकार घ्यावा असही शेंडे म्हणासे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

SCROLL FOR NEXT