nawab malik , anil deshmukh esakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik Bail : नवाब मलिकांच्या जामिनानंतर अनिल देशमुख बोलले; म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण...

संतोष कानडे

Mumbai News : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. त्यांच्या जामिनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख पत्रकार परिषदेद्वारे म्हणाले की, नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने बेल मंजूर केल्यामुळे सगळ्यांना आनंद आहे. दीड वर्षे मलिक जेलमध्ये होते. सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरुय, ते दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवून कारवाई केली जात आहे.

''तपास यंत्रणांचा दुरुपयोग हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल, दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही होत आहे. राजकारणासाठी ईडीच्या चौकश्या लावल्या जातात, परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे'' असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सत्तेमध्ये असताना मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं.

२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. अजित पवारांनी आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तापक्षाला समर्थन दिलं. एकीकडे अनिल देशमुख जेलबाहेर आलेले असताना दुसरीकडे नवाब मलिकांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. शेवटी आज मलिकांनाही जामीन मंजूर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा किरकोळ महागाई दर वाढला! सलग तिसऱ्या महिन्यात किंमती वाढलेल्याच, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर काय?

VAIBHAV SOORYAVANSHI: संजू सॅमसन की वैभव सूर्यवंशी? दुसऱ्या टी-२०आधी टीम इंडियासमोर मोठा सवाल; ‘या’ समस्येचाही शोधावा लागणार उपाय

Vastu Tips: घरात मांजर पाळताय? मांजर पाळण्यापूर्वी जाणून घ्या वास्तुचे 'हे' नियम; नाहीतर वाढेल नकारात्मक ऊर्जा!

Interesting Money Story: कुत्र्याला फिरवायला गेले अन् नशीबच पालटलं! ना लॉटरी, ना वारसा... एका क्षणात झाले करोडपती; नेमकं काय घडलं?

अंकिता वालावलकरने गणेशोत्सवादिवशीच दिली गुडन्यूज, मुंबईत घेतलं स्वतःचं घर; कुठे आहे तिचा २ बीएचके? म्हणते- सध्या इंटेरिअर...

SCROLL FOR NEXT