nawab malik esakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik : नवाब मलिकांना कोर्टाचा आणखी एक दिलासा; हमीदार सादर करण्यास मुदतवाढ

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना कोर्टाने आणखी एक दिलासा दिला आहे. हमीदार सादर करण्यासाठी त्यांना महिन्याभराची मुदत मिळालीय. १४ ऑगस्टला मलिकांना जामीन मिळाला होता.

जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र अद्यापही मलिकांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांना कोर्टाने माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे. असं असलं तरी कोल्हापूरच्या सभेत शरद पवारांनी मलिकांचं नाव घेऊन ते आपल्या सोबत आहेत, असा मेसेज दिला होता.

नवाब मलिकांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी त्यांची भेट घेतली होती. मलिकांना कोर्टाने प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन दिलेला आहे. आज पुन्हा त्यांना दुसरा दिलासा मिळाला असून हमीदार सादर करण्यासाठी महिन्याभराची मुदत दिलीय.

मलिक यांची १४ ऑगस्टला वैद्यकीय जामीनावर सुटका झालेली असून ५० हजारांच्या कॅश हमीवर न्यायालयाने त्यांना जामीन दिला. हमीदार (श्यूरिटी) सादर करण्यासाठी न्यायालयाने मलिकांना सुरुवातीला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. आता हमीदार सादर करण्यास महिन्याभराची मुदत दिली आहे. विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांची विनंती केली मान्य केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT