Nawab Malik-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

''...तर आता देवेंद्र फडणवीस माफी मागणार का?'' नवाब मलिकांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, मी आरोप केल्यानंतर कोणालाही माफी मागत नाही. त्यावरूनच आता मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीसांना सवाल विचारले आहेत. '' फडणवीस म्हणाले होते की, नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरून गांजा मिळाला. देवेंद्रजी तुमचे वानखेडेसोबत संबंध आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागवा की काही आक्षेपार्ह वस्तू सापडली का? त्यांच्याकडे पंचनामा आहे. नाहीतर मी पंचनामा सार्वजनिक करेन. तर देवेंद्रजी आता तुम्ही माफी मागणार का?'' असा सवाल मलिकांनी उपस्थित केला.

''जयदीप राणा हा ड्रग्स पेडलर आहे. त्याबाबत मी तुम्हाला माहिती दिली. तो एका गाण्याचा फायनान्स हेड होता. मी कोणाच्या पत्नीचा यामध्ये उल्लेख केला असं म्हटलं जात आहे. गेल्या २६ दिवसांपासून दोन महिलांशिवाय कोणाची पत्नी, आई, बहीण यांचा उल्लेख केला नाही. या दोन्ही महिलांचा संबंध आहे त्यामुळे त्यांचा उल्लेख मी केला.'' असंही नवाब मलिक म्हणाले.

दुसऱ्यांची आई-बहीण या महिला नाहीत का? -

''किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या आई आणि बहिणीचा उल्लेख केला. खडसे आणि संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. या महिला नाहीत का? फक्त भाजप नेत्यांच्या घरातील महिला या महिला आहेत का? टीका करण्याच्या बाबतीत भाजपचा स्तर घसरला आहे'', असेही ते म्हणाले.

''ड्रग्स पेडलर हे फायनान्स हेड आहेत हे आरोप मी हवेत केले नाही. मी जावयाचे आरोपपत्र कमजोर करण्यासाठी हे आरोप करत आहे, अशी टीका फडणवीसांनी केली. मात्र, तुम्ही वकील आहात. त्यामुळे एनडीपीएस कायद्याची माहिती तुम्हाला माहिती असेल. हे आरोप खोटे आहेत. यासाठी आता तुम्ही माफी मागणार का?'' असेही नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

SCROLL FOR NEXT