Nawab Malik sakal media
महाराष्ट्र बातम्या

'तुम्ही कोणते टॉनिक घेता? यावर एखादा उपाय तरी सूचवा'

याआधीही अभिनेता राजू श्रीवास्तव यांनी असे वादग्रस्त विधान केले होते.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवस सातत्याने पत्रकार परिषद घेणार राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक चर्चेत आहेत. समीर वानखडे प्रकरणातही त्यांचे नाव वारंवार समोर येत होते. ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यावर त्यांनी काही आरोपही केले होते. दरम्यान, याकाळात त्यांची अनेक ट्वीट्स समोर आली होती. आताही त्यांनी आणखी एक कोरोनासंबंधित ट्वीट केले आहे. यात त्यांनी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

यात शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने महाराष्ट्रात १३ मंत्री आणि ७० विधायक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आता तो दिवस दुर नाही जेव्हा पुढे जाऊन कोरोनाच आपले सरकार प्रस्थापित करले, असे विधान केले आहे. त्यावर तुम्ही कोणते टॉनिक घेता, या तोडग्याचा एखादा उपाय तरी सूचवा, असा उपरोधिक टोला मंत्री मलिक यांनी लगावला आहे. याआधीही अभिनेता राजू श्रीवास्तव यांनी असे वादग्रस्त विधान केले होते. आता आणखी एका वाक्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे सर्व पक्षांनी कबंर कसली आहे. या रिंगणात आता राष्ट्रवादी पक्षही उतरणार आहे. तीन राज्यांतील निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादीही उतरणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता अगामी निवडणुकीत चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT