महाराष्ट्र बातम्या

नवाब मलिकांनी शेअर केला वानखेडेंच्या ‘निकाह’चा फोटो; म्हणाले, 'त्यांच्या धर्माशी...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरु झालेली आरोपांची मालिका अद्याप सुरुच आहे. याआधी वानखेडे यांच्या कारवांयावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर वानखेडेंनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. आता समीर वानखेडे यांनी हिंदु असल्याचा दावा करत असताना मलिकांनी नवा खुलासा केला. ट्विटरवर त्यांनी गूड मॉर्निंग म्हणत समीर वानखेडेंचा पहिला निकाह झाला होता असं म्हटलं आहे. त्यांच्या या निकाहचे प्रमाणपत्र आणि फोटो देखील त्यांनी ट्विटरवर जाहीर केला आहे.

नवाब मलिकांनी म्हटलंय की, मी हे स्पष्ट करु इच्छितो की, मी जो समीर वानखेडेंबाबत खुलासे करत आहे, ते धर्मासंबंधी नाहीयेत. ज्यापद्धतीने फसवणूकीच्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी प्राप्त करण्यासाठी एका मागासवर्गीय जातीच्या व्यक्तीवर अन्याय करुन खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ही नोकरी मिळवली आहे.

सोबतच त्यांनी समीर वानखेडे यांच्या डॉ. शबाना कुरेशीसोबतच्या विवाहाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तसेच त्या लग्नाचा 'निकाह नामा' देखील त्यांनी प्रसिद्द केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT