Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: मलिक कोणत्या गटात? कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वतः शरद पवार करणार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 17 महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. अवघ्या दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणास्तव मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यामुळे आज मलिक तुरुंगाबाहेर येणार आहेत.

त्यामुळे मलिक अजितदादा गटात जाणार की शरद पवार गटात जाणार? मंत्रीपदी बसणार की राष्ट्रवादीचं काम करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलिक यांच्या आगामी भूमिकेबाबत सस्पेन्स कायम असतानाच आज शरद पवारांनी ते सुटल्यानंतर मी त्यांना भेटणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणालेत शरद पवार?

नवाब मलिक यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. ते कारागृहात अजून बाहेर आलेले नाही. कदाचित आज ते कारागृहातून बाहेर येऊ शकतात. ते कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील एकुण आमदांरापैकी किती आमदारांनी अजित पवार गटाला आणि शरद पवार गटाला पाठिंबा दिला याबाबत स्पष्टता हळूहळू दिसू लागली आहे.


दरम्यान ज्या नेत्याने आणखी कोणालाही पाठिंबा दिला नाही त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुरूगांत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने ते कोणाला पाठिंबा देणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT