Nawab-Malik sakal media
महाराष्ट्र बातम्या

''बात निकलेगी तो...'', मलिकांचं सूचक ट्विट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) दररोज एक नवीन ट्विट करून समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी असंच एक ट्विट करून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. आज आणखी त्यांनी एक सूचक ट्विट केले असून मलिक आता नेमका कोणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिकांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, की ''बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे''. त्यामुळे आता ते कोणाचं प्रकरण बाहेर काढतात? आणि कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत. या ट्विटवर अनेकांनी मलिकांवर टीका केली आहे, तर काहींनी त्यांचे समर्थन देखील केले आहे.

मलिकांनी यापूर्वी केलेले आरोप -

नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन दावे करत आहेत. त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा फोटो ट्विट करत ते मुस्लीम असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला आणि निकाहनामा देखील ट्विट केला होता. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. समीर वानखेडे हे मुस्लीम असून त्यांनी एका अनुसूचित जातीच्या मुलाचा हक्क बळकावला आहे, असा आरोप मलिकांनी केला आहे. त्यानतंर वानखेडे कुटुंबीयांकडून त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. तरी देखील मलिक आपल्या दाव्यावर ठाम आहे. मंगळवारीच त्यांनी पत्रकार परिषद घेत, समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले.

फडणवीसांवरही आरोप -

मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबत फोटो ट्विट करत फडणवीसांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच राज्यात फडणवीसांच्या आशीर्वादाने ड्रग्सचा धंदा चालतोय असाही आरोप मलिकांनी केला होता. त्यानंतर फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. आता परत मलिकांनी नवे ट्विट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT