nawab malik-sameer wankhede esakal
महाराष्ट्र बातम्या

''समीर दाऊद वानखेडे'', नवाब मलिकांनी शेअर केला जन्माचा दाखला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) हे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. आता त्यांनी ट्विटरवर एक जन्माचा दाखला शेअर केला असून हा दाखल समीर वानखेडे यांचा असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच 'समीर दाऊद वानखेडे, का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा' असा सवाल मलिकांनी वानखेडेंना विचारला आहे.

नवाब मलिकांनी यापूर्वी देखील समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. तसेच एक वर्षात तुझी नोकरी जाईल, तुला तुरुंगात जावं लागेल, असं जाहीर भाष्य केलं होतं. तसेच पत्रकार परिषद घेऊन देखील वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. आता आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने एक अॅफिडेविट आणि व्हिडिओ जारी करत समीर वानखेडेंकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच आर्यन खान प्रकरण हे २५ कोटींमध्ये दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी ८ कोटी समीर वानखेडे यांना जाणार होते, असाही गंभीर आरोप साईलने केला आहे.

प्रभाकर साईलच्या आरोपानंतर नवाब मलिक अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी काल सत्यमेव जयते, असे ट्विट केले होते. तसेच आज त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील एक फोटो देखील शेअर केला आहे. मलिकांनी जन्माचा दाखला ट्विट केला असून हा दाखल समीर वानखेडे यांचा असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. यामध्ये समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद क. वानखेडे असं दाखवत आहे. तसेच या दाखल्यावर मुंबई महापालिकेचे नाव आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात असून याबाबत तक्रार करणार आहे. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. या खोडसाळपणाला कायदेशीर उत्तर देणार आहे, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT