Nawab Malika Run to the Supreme Court against EDs action Nawab Malika Run to the Supreme Court against EDs action
महाराष्ट्र बातम्या

ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malika) यांना ईडीने (ED) अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणी मुंबई न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Nawab Malika Run to the Supreme Court against EDs action)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) कथित स्वरूपात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने (ED) अटक केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टाने १३ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अंथरुणासोबत एक खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.

नवाब मलिक (Nawab Malika) यांना अटक केल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता मलिक (Nawab Malika) यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती. कोठडी संपत असल्याने त्यांनी पुन्हा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. तेव्हा कोर्टाने त्यांना ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

नवाब मलिकांच्या वकिलांनी मलिकांच्या अटक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच न्यायालयीन कोठडीला विरोध दर्शवला आहे. मुळातच ईडीची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत मुंबई हायकोर्टातही ईडीच्या कारवाईला आव्हान दिले. मात्र, मुंबई न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे नबाव मलिक (Nawab Malika) यांनी ईडीच्या (ED) कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT