Nawab Malik Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nawab Malik: अजित पवार की शरद पवार? नवाब मलिकांचं ठरलं! अधिवेशनावेळी बसले 'या' गटासोबत

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. यावेळी दोन्ही गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. ते कोणत्या गटात जाणार ते त्यांनी स्पष्ट केलेलं नव्हतं, त्यामुळे ते आज अधिवेशनावेळी कोणत्या गटासोबत बसणार याबाबतचे तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात होते. आज ते स्पष्ट झालं आहे. आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भुमिका जाहीर केली होती. त्यानंतर मलिक बेलवरती बाहेर आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. तर काही दिवसांपुर्वी ते अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, मात्र आज अधिवेशनावेळी मलिक यांनी अजित पवार गटासोबत बसून याबाबतचा संभ्रम दूर केला आहे.

हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

आजपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्यांवरून जुंपण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अवकाळी पाऊस, पीकविमा, मराठा आणि धनगर यांच्या आरक्षणाचा मुद्दा यासारख्या विषयावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांना काय उत्तर देणार? त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये कोणकोणते मोठे निर्णय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT