samir wankhede-aryan khan google
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खान प्रकरण : प्रभाकर साईलच्या गंभीर आरोपानंतर NCB चं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील (aryan khan drugs case) पंच प्रभाकर साईलने एक व्हिडिओ आणि अॅफीडेविटमधून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (ncb officer samir wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २५ कोटींची डील करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा खळबळजनक आरोप त्याने केला आहे. त्यानंतर आता एनसीबीचे अधिकारी अशोक जैन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचे अॅफिडेविट मी पाहिले आहे. पण, ते सर्व आरोप आमच्या एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. तो या प्रकरणात पंच असल्यामुळे त्याने न्यायालयात आपले म्हणणे मांडायला पाहिजे होते. असे आरोप सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून करू नये. सध्या प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे प्रभाकर साईलने सोशल मीडियावरून अशी प्रतिक्रिया देऊ नये. हे अॅफिडेविट एनसीबीच्यी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही अशोक जैन यांनी प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.

प्रभाकर साईलने नेमके काय आरोप केलेत? -

क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी प्रभाकर साईल किरण गोसावीसोबत होता. सॅम नावाच्या व्यक्तीला आणि गोसावीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना त्याने पाहिले. ''आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजाला हे दोघे भेटले. त्यांच्यामध्ये निळ्या मर्सिडीज कारमध्ये बोलणे झाले. हे प्रकरण दाबण्यासाठी हे बोलणं सुरू होते. २५ कोटींमध्ये ही डील झाली होती. त्यानुसार ८ कोटी समीर वानखेडे सरांना द्यायचे आहेत आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी फोनवरून कोणासोबत तरी बोलला होता. तसेच एनसीबीने मला खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली'' असे गंभीर आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहेत.

समीर वानखेडेंची प्रतिक्रिया काय? -

प्रभाकर साईलने केलेल्या गंभीर आरोपानंतर समीर वानखेडे यांनी एका माध्यमासोबत बोलताना प्रतिक्रिया दिली. ''प्रभाकर साईलच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देईन'' असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT