Speculation Sameer Wankhede Join BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडे RSS च्या मुख्यालयात! भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण Sameer Wankhede join BJP

सोडणारे समीर वानखेडे लवकरच राजकारणात

सकाळ डिजिटल टीम

Speculation Sameer Wankhede Join BJP: महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) काळात एनसीबीच्या (NCB) माध्यमातून ड्रग्ज तस्कर आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडणारे समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे लवकरच राजकारणाच्या रिंगणात पाऊल ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समीर वानखेडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. आणि त्याला करण ठरलं आहे ते नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला समीर वानखेडे आणि पत्नी क्रांती रेडकर यांनी दिलेली भेट.

समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. त्यानंतर केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहून दर्शन घेतले. त्यामुळे समीर वानखेडे आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.

दरम्यान वाशिम जिल्ह्यातील (Washim District) एका वृत्तपत्रात समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणारी जाहिरात सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. वृत्तपत्राच्या एका संपूर्ण पानावर समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं छायाचित्र झळकलं होतं.

वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिक आणि शेतकऱ्यांना वानखेडे परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आनंदमय आणि भराभराटीची जावो, असा मजकूर या जाहिरातीमध्ये (Diwali Advertisement) देण्यात आला होता. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT