NCB Seized Drugs e sakal
महाराष्ट्र बातम्या

NCB ची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरून ३ किलो ड्रग्स जप्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटने (NCB Mumbai) ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला देखील एनसीबीने ताब्यात घेतलं आहे.

मुंबई विमानतळावर ड्रग्स असल्याची गुप्त माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी बॅगमध्ये ड्रग्सचे चार पाकिटे आढळून आले. यामध्ये जवळपास ३ कोलि ९८० ग्रॅम हेरॉईन होते. एनसीबीने हे ड्रग्स जप्त करून एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, गेल्या १३ मार्चला दहीसर पोलिसांनी देखील ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई केली होती. दहीसर टोल नाक्याजवळून ६ किलो ५६० ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या ड्रग्सची किंमती १ कोटी ९५ लाख रुपये होती. तसेच यावेळी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT