महाराष्ट्र बातम्या

Caste Census In Maharashtra : एकदा होऊनच जाऊद्या! जातीनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका

जातनिहाय जनगणनेबाबत अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे.

रोहित कणसे

बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसकडून देशातील इतर राज्यांमध्ये देखील जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. या मागणीला भाजपकडून विरोध होत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात देखील अशी जातनिहाय जनगणना घेण्याची मागणी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. आम्ही देखील वेगवेगळ्या समाजांच्या आरक्षणाच्या बाजूचेच आहोत. पण आमची भूमिका आता दिलेल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजांना आरक्षण देण्याची आहे असे अजित पवार म्हणाले. हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात दिलेलं आरक्षण टीकावं आणि सगळ्यांनी समाधानाने राहावं, जातीपातींमध्ये सलोखा राहावा अशी आमची भूमिका आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

जातनिहाय जनगणना होऊच द्या

आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही मागणी केली आहे की, जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जातनिहाय जनगणना केली, तसं महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना होऊच द्या. नक्की महाराष्ट्रात किती मगासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, भटके, अल्पसख्यांक आणि किती ओपनमध्ये आहेत ते कळलं पाहिजे.

त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणात नीधी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे जातनिहाय जनगणना २०११ च्या नंतर २०२१ ला व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. मी बिहार सरकारकेड त्यांनी कशा पद्धतीने जनगणना केली याची माहिती मागितली आहे. त्यासाठी हजार कोटी खर्च होतील, पण झाले तरी हरकत नाही. पण एकदा समाजासमोर स्पष्ट चित्र आलं पाहिजे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

सकल मराठा सामज जी मागणी करतोय ती पूर्णत्वाला नेत असताना इतर इतरांच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहीजे. त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या नाही पाहीजेत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT