Ajit Pawar  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : शपथविधीला गैरहजर नेत्यांची यादी उघड; अजित पवारांसोबत अवघे २२ आमदार?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज महाभूकंप बघायला मिळाला. अजित पवार यांच्यासह शरद पवारांच्या अत्यंत जवळचे नेते सत्ताधारी भाजप-शिवसेना गटाला जावून मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शरद पवारांनी मात्र आपण पुन्हा कामाला लागू आणि पक्ष उभा करु, अशी भूमिका घेतली आहे. त्यातच आता अजित पवार यांच्या शपथविधीला गैरहजर असलेल्या आमदारांची यादी समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ५४ आमदार आहेत. अजित पवार यांनी सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं. मात्र शपथविधी वेळी राष्ट्रवादीचे केवळ २२ आमदार उपस्थित होते.

उपस्थित आमदार

यामध्ये अजित पवारांसह नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, किरण लहामटे, दौलत दरोडा, बाबुरा अत्राम, अनिल पाटील, सुनील टिंगरे, अतुल बेणके, शेखर निकम, दत्ता भरणे, अदिती तटकरे, सरोज अहिरे, निलेश लंके, मकरंद पाटील, अशोक पवार असे २२ हून अधिक आमदार होते.

गैरहजर आमदार

गैरहजर आमदारांमध्ये जयंत पाटील, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख, चेतन तुपे, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप, रोहित पवार, प्रकाश सोळंखे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, बाबासाहेब पाटील, बबन शिंदे, यशवंत माने, दीपक चव्हाण, राजेश पाटील, मानसिंग नाईक, इंद्रनिल मनोहर नाईक, सुमन पाटील, नितीन पवार, माणिकराव कोकोटे, दिलीप बनकर, सुनिल भुसारा, अशोक पवार, सचिन शेळके यांचा समावेश आहे. एकूणच २७ हून अधिक आमदार उपस्थित नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बडे नेते पोलिसांच्या ताब्यात

Sugarcane Protest: अंगावर पाऊस, डोळ्यांत आशा; उसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचा 'गोकूळ'विरुद्ध संघर्ष सुरूच, जिल्‍हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ..

June Smartphone Launch : जूनमध्ये लाँच होतायत 'हे' 5 दमदार स्मार्टफोन्स; परवडणारी किंमत अन् जबरदस्त फीचर्स पाहा

Tukaram Mundhe Birthday: तुकाराम मुंढेंचा जन्मदिवस! शेतकरी पुत्र ते आयएएसपर्यंतचा प्रवास; प्रामाणिकपणा आणि शिस्तीची कहाणी

SCROLL FOR NEXT