NCP Ajit Pawar on CM eknath shinde birthday kasaba by election koyata gang Maharashtra politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Shinde Birthday : टाईम स्वेअरमध्ये झळकलं CM शिंदेंचं बॅनर; अजित पवार म्हणाले....

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माध्यमांशी बोलताना अजित पवार याबद्दल माहिती दिली, सोबतच राज्यातील इतर अनेक मुद्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या असून आपली परंपरा आहे की सुख दुःख मध्ये आधार देण्याचे आपण काम करतो. आज सकाळी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत असे अजित पवार यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाबद्दल बोलताना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाची एक क्लिप बघितली ज्यात टाइम्स स्केवरमध्ये पण वाढदिवस साजरा होतो आहे, असेही मिश्कील टिप्पणी देखील अजित पवार यांनी केली.

पुढे बोलताना चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. चिंचवड मध्ये प्रयत्न आहे यश आले तर ठीक असे मत त्यांनी व्यक्त केले.

भ्याड हल्ल्याचा निषेध

काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, मला सकाळी बातमी पाहायला मिळाली. राजीव सातव यांनी उत्तम काम केलं होतं. राहुल गांधी यांचे जवळचे ते होते.

अतिशय कमी वयात ते आपल्याला सोडून गेले. प्रज्ञा ताई यांच्यावर जबाबदारी पडली आहे. राजकीय वारसा त्या पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर दगडफेक झाली त्या गोष्टीचा ही निषेध आहे असे अजित पवार म्हणाले.

एखादा लोकप्रतिनिधी, खासदार,आमदार यांच्या सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यांची असते. कोण मास्टरमाईंड या हल्ल्यामागे आहे ते शोधून काढले पाहिजे. अशा प्रकारचे हल्ले कोणावर होता कामा नये असेही अजित पवार म्हणाले.

कोयता गँग..

मला पोलिसांनी सांगितले मला गृहमंत्री यांनी देखील सांगितलं त्यांचे म्हणणे आहे की या गोष्टीला मीडिया खूप वर उचलते आहे. कोयता विक्री केली जाते तिथे नवीन नियम केले आहेत. पोलिस म्हणत आहेत कोयता गँग म्हणण्याचे कारण नाही कारण जिथे प्रकार घडले तर तिथे तडीपार मोका लावला जातो आहे. काही भागात असे आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. एखादा कोयता काढला की त्याला गँग म्हटलं जातं आहे असे पोलिस सांगत आहेत असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

Ganeshotsav Police Guidelines : करमाडमध्ये गणेश मंडळांना पोलिसांचा सल्ला; डीजेचा दणदणाट टाळा, रक्तदानाचा आदर्श घडवा

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

SCROLL FOR NEXT