NCP Ajit pawar on rahul narvekar age corrected devendra fadanvis maharashtra politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

सभागृहात अजित पवारांनी सुधारली फडणवीसांची चूक, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकार बहुमत चाचणीला समोरे गेलं आणि सरकारने यशस्वीरित्या बहुमत सिद्ध देखील केलं. या दरम्यान विरोधीपक्ष नेते पदाची धुरा ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आली आहे. दरम्यान विरोधीपक्षनेते पद स्विकारल्यानंतर पहिल्याच भाषणात अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चूक सुधारली.

काल झालेल्या विधानपरिषद आध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना राहुल नार्वेकर हे सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष असल्याचे म्हटले होते . यावर आज बोलताना अजित पवार यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली.

अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले की, कोरोनामुळे पहिल्या अधिवेशनानंतर अधिवेशन झालचं नाही. मागील अडीच वर्षात मंत्र्यांना मतदारसंघातील कामांसाठी अपेक्षित वेळ मिळाला नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले. आपण तरूण आहात, पण काल मी आणि फडणवीस यांनी बोलताना तुम्ही सर्वात तरूण अध्यक्ष असल्याचा उल्लेख केला, ते लक्षात आणून देण्यात आलं. आपण ४५ वर्षाचे आहात, शिवराज पाटील ४२ वर्षांचे असताना सभागृहाचे अध्यक्ष झाले होते, एखादी गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर ती चूक सुधारण्याची तयारी असते, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचे सर्वांगीन प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाला जास्तीत जास्त दिवस कसे मिळतील याकडे लक्ष देण्याची विनंती त्यांनी केली.

अजित पवार म्हणाले की, या सभागृहात शिस्त रहावी सभागृहाचं पावित्र रहावं. असं कुठलंच काम आपल्या कुणाकडूनच होता कामा नये. मी २००४ सालापासून आमदार म्हणून पाहिलं. पण तुमचं असं भाषण कधी ऐकलं नव्हतं. सभागृहाला सांगू इच्छितो की विधीमंडळात काम करताना न्यायपालिकेला हस्तक्षेप करावा लागू नये याची काळजी घ्यावी.

सत्तेत नसतानाही चांगला विरोधीपक्ष नेता राज्याच्या विकासात चांगल योगदान कसा देऊ शकतो हे आधीच्या लोकांनी दाखवून दिलं आहे. सरकारची भूमिका जर राज्याच्या विरोधात जाणार असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. एकही कायदा सभागृहात चर्चेशिवाय होणार नाही, असेही त्यांनी बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

तुम्हाला अतिवृष्टीची भरपाई मिळाली नाही का? शेतकऱ्यांनी ‘येथे’ तातडीने काढावा फार्मर आयडी; सोलापूर जिल्ह्यातील ४.९० लाख शेतकऱ्यांना ४९८ कोटींची भरपाई अजूनही मिळाली नाही

७ नोव्हेंबरपासून मुंबईला दररोज विमान! डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमान; गृह विभागाकडून मिळेना पोलिसांचे मनुष्यबळ, पोलिस ठाण्याचाही प्रस्ताव धुळखात

अग्रलेख : पाणी वाहते झाले...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात १५ मिनिटांत बनवा ओट्स अन् एग ऑमलेट,सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT