sunetra pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sunetra Pawar: राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब; आज अर्ज दाखल करणार

Sunetra Pawar Will be rajyasabha candidate: राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज त्या अर्ज दाखल करणार आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज त्या अर्ज दाखल करणार आहेत. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, आज त्यांचे नाव निश्चित झाले असून काही वेळात त्या अर्ज दाखल करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून छगन भुजबळ हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. पण, त्यांना संधी देण्यात आलेली नाही. भुजबळ यावर बोलताना म्हणाले की, 'होय मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो. पण, पक्षाने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. मी आजिबात नाराज नाही.'

प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. मी एक कार्यकर्ता आहे. त्यांनी काही विचार करुन सुनेत्रा यांना राज्यसभेवर पाठवण्याचं ठरवलं आहे. काही निर्णय आपल्या मनासारखे होत नाहीत. पण, आपण पक्षात काम करत असताना काही गोष्टी ऐकाव्या लागतात. मी काही अपक्ष नाही. पक्षासोबत मी आहे. त्यामुळे मी त्यांच्या निर्णयाचा मान राखतो. इच्छा होती, पण मला संधी देण्यात आली नाही याबाबत माझ्या मनात नाराजी नाही, असं देखील भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सुनेत्रा पवार या भाजपच्या मदतीने खासदार होतील. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मैदानात होत्या. पण, याठिकाणी त्यांचा पराभव झाला आहे.

अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती केली होती. त्यानंतर अजित पवार गटाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या देखील नावाची चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT