NCP Ajit Pawar warn bjp chandrashekhar bawankule over Baramati ncp politics remark  
महाराष्ट्र बातम्या

Video : शिवतारेंनंतर अजित पवार पुन्हा करणार 'करेक्ट कार्यक्रम'; विधानसभेत म्हणाले, 'मनात आणलं तर…'

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत बोलताना बारामतीत राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडू या भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घोषणेचा समाचार घेतला. यावेळी अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

अजित पवार म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात सरकार (शिंदे-फडणवीस सरकार) आल्यानंतर आपले एक नेते माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा वल्गना करतात. आता आमतं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का?"

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

"जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, महाराष्ट्राला माहिती आहे मी एखाद्याला चॅलेंज दिल की च्या आयला…तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही, हे पण खरं आहे. त्यांना म्हणावं जरा दमानं. फार फास्ट गाडी चालली, फास्ट गाडीचा कधी अपघात होईल आणि कोलमडून पडाल सांगता येणार नाही."

बावनकुळे काय म्हणाले होते?

मागिल काही दिवसांपासून पवारांचे होमग्राउंड असलेल्या बारामतीत भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी जोर लावला जात आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडू, असं थेट आव्हान अजित पवार यांना दिलं होतं. यादरम्यान बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही बावनकुळे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पेरांबूरला भेट देत आहेत

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT