Amol Mitkari  
महाराष्ट्र बातम्या

Amol Mitkari: गाडी फोडली तरी मिटकरींची माघार नाही, 'सुपारीबहाद्दर' म्हणत पुन्हा डिवचलं, मनसैनिकांच्या भूमिकेकडे लक्ष!

Amol Mitkari again Criticize Raj Thackeray: मनसैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली होती. असे असले तरी मिटकरींनी राज ठाकरेंवर निशाणा साधण्याचं सोडलं नसल्याचं दिसत आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. मनसैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली होती. असे असले तरी मिटकरींनी राज ठाकरेंवर निशाणा साधण्याचं सोडलं नसल्याचं दिसत आहे. त्यांनी एक सोशल मिडिया एक्सवर ट्वीट करून मनसैनिकांना पुन्हा डिवचलं आहे.

राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते धाराशिवमध्ये आहेत. धाराशिवमध्ये एका हॉटेलमध्ये थांबले असताना त्याठिकाणी मराठा आंदोलक आले होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. राज ठाकरेंना आक्रमक मराठा आंदोलकांची दखल घ्यावी लागली होती. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे.

मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलंय की,'वाघांनी सुपारीबहाद्दराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखविली. ये वो शेर है जो रुकते नही, थकते नही, झुकते नही,और बिकते भी नही... आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही.' मिटकरींना नाव न घेता राज ठाकरेंना डिवचलं आहे. त्यामुळे मनसैनिक याला कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल.

राज ठाकरे यांनी धाराशिवमध्ये बोलताना महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी राज ठाकरे ज्याठिकाणी थांबले होते त्याठिकाणी जाऊन जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी राज ठाकरे स्वत: खाली आले अन् त्यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. माझ्याशी बोलायचं असेल तर आधी घोषणाबाजी बंद करा त्यानंतरच आपण चर्चा करू असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी मराठा आंदोलक प्रतिनिधींची चर्चा केली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं अन् आपली भूमिका स्पष्ट केली. सदर प्रकरामुळे काहीशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाच मुद्दा पकडत अमोल मिटकरींनी टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

Pune News : खासगी ट्रॅव्हल्स बसेसना पुणे शहरात नवे नियम लागू, नवीन मार्गांची अंमलबजावणी सुरू

SCROLL FOR NEXT