Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : 'त्या' वक्तव्याबद्दल अजित पवारांनी मागितली माफी

अजित पवारांच्या या विधानानंतर मोठा वादंग निर्माण झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. मात्र यावेळी अजित पवारांनी लगेचच दिलगिरी व्यक्त केली आहे.

विधानभवनात हिवाळी अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर असा उल्लेख करण्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर या वादाला तोंड फुटलं होतं. त्यावरुन राज्यभरात निदर्शनेही झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र अजित पवारांची पाठराखण केली आहे. पण आता अजित पवारांकडून पुन्हा वादग्रस्त उल्लेख झाला आहे.

पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्याविषयी बोलताना, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा झाला. यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली.

मात्र, या उल्लेखानंतर लगेचच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. "पुणे येथील कार्यक्रमात भाषणावेळी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब' या महामानवांचं स्मरण करताना, कर्तृत्व सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' ऐवजी 'क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर' असा उल्लेख झाला. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो," अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT