Ajit pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'मला विरोधी पक्षनेता म्हणू नका!'; अजित पवारांच्या विधानाची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या मिश्किल स्वभावामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. मिश्किल टिप्पण्या, चेष्टा मस्करीमुळे चर्चेत असलेले दादांनी आता पुन्हा एकदा एका कार्यक्रमात हास्यकल्लोळ केला आहे. कार्यक्रमाला येतो पण मला विरोधी पक्षनेता म्हणू नका अशी गजब अट अजित पवारांनी घातल्याचं खुद्द त्यांनीच सांगितलंय.

अजित पवार आज अहमदनगरमधल्या श्रीगोंद्यामध्ये ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमानंतर जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कोणीतरी कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी त्याचं आमंत्रण स्विकारताना अजितदादांनी त्यांची चांगलीच चेष्टामस्करी केली. "मी कार्यक्रमाला येतो, फक्त मला विरोधी पक्षनेता म्हणू नका", असं अजित दादांनी म्हणतात उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

अजित दादांनी पुढेही चांगलीच मजा घेतली. आता कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यांच्या मनता आलं आणि ते २० लोक घेऊन गेले. सगळीकडे सध्या ओके ओके सुरू आहे, असं विधानही अजित पवारांनी यावेळी केलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आम्हीसुद्धा दरवर्षी गणपतीच्या दर्शनाला जातो, पण कॅमेरे घेऊन जात नाही. पूर्वी काही शो मॅन होते, तसे काही जण आता दिसतायत, असं विधान अजित पवारांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

National Doctors' Day 2026: रुग्णसेवेच्या धावपळीत डॉक्टरांचेच आरोग्य धोक्यात? तज्ज्ञांनी सांगितली डॉक्टरांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची महत्त्वाची कारणे

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

'त्यांनी मला पुन्हा विद्यार्थी बनवलं'; विजया मेहता यांच्या निधनानंतर अनुपम खेर भावुक

Electric Shock : विजेचा धक्का लागून बालकाचा मृत्यू; नातेवाईकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT