Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र

"फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; CM एकनाथ शिंदेंना पत्र

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सेनेशी बंड करून भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर "देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका" अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. फडणवीस धोका देतात त्याच्यावर विश्वास ठेऊ नका असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

(Eknath Shinde News)

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दरम्यान भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीसाठी मागणी केल्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित फडणवीसांवर विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री सध्या त्यांच्या गटातील गोव्यात असलेल्या आमदारांना आणण्यासाठी गेले आहेत. ते आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले असून यानंतर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे. उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असून त्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाणार आहे. तर शिवसेनेने उद्याच्या अध्यक्ष निवडीसाठी आपल्या आमदारांना व्हीप जारी केला होता. त्यावर बोलताना, "आमच्याकडे बहुमत असून शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान फडणवीस हे धोका देणारे असून त्यांच्यावर स्वप्नातही विश्वास ठेऊ नका असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT