महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. "राष्ट्रवादी'तही कोणी नाराज नाही. उलट मी अनेकांना, "गृह खाते हवे का?' अशी विचारणा केली. परंतु, कोणीच तयारी दर्शविली नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. तसेच 
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार म्हणतात; राष्ट्रवादीत 'हे' खाते घेण्यास कोणीच तयार नाही

वृत्तसंस्था

नगर : महाआघाडीतील कोणत्याच पक्षात कोणीही मंत्रिपदावरून नाराज नाही. "राष्ट्रवादी'तही कोणी नाराज नाही. उलट मी अनेकांना, "गृह खाते हवे का?' अशी विचारणा केली. परंतु, कोणीच तयारी दर्शविली नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे सांगितले. तसेच, खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्या सकाळी जाहीर करतील, असेही पवार म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ऍड. रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""मंत्री झाल्यानंतर खातेवाटप करताना प्रत्येक वेळी दोन दिवस लागतातच. मी मंत्री होतो. त्या वेळीही नंतर खातेवाटप व्हायचे. एका पक्षाचे सरकार असताना असे व्हायचे; आता तर तीन पक्ष आहेत. सुदैवाने या तिन्ही पक्षांमध्ये कोणती खाती द्यायची, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला आहे. आता फक्त संबंधित पक्षनेत्यांनी त्या त्या मंत्र्यांना खाती द्यायची आहेत. खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही.'' 

लोकपालाच्या नावाखाली कोट्यवधींचा भुर्दंड

"राज्यात मंत्रिपदे देताना नगर जिल्ह्याचा आम्ही वेगळा विचार केला. ज्या तालुक्‍याला मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती, त्यांना दिली आहे. अन्य तालुक्‍यांना मंत्रिपदे मिळाली होती. राहुरीलाच यापूर्वी ते मिळाले नसल्याने आम्ही या तालुक्‍यात मंत्रिपद दिले,'' असेही शरद पवार यांनी आज स्पष्ट केले. नगर जिल्ह्यात नवीन पिढी आणण्याचा प्रयत्न केला. नव्या पिढीला कामही खूप देणार आहोत. राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने, प्रत्येकाकडे पाच-सहा खाती द्यावी लागतील, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना मिळणार 'हे' खाते?

अन्य राज्यांतही पुढाकार घेणार ः पवार 
"महाराष्ट्रात झालेल्या महाआघाडीच्या प्रयोगाचे अनेक राज्यांनी स्वागत केले आहे. त्यादृष्टीने अनेक राज्यांतून आम्हाला विचारणा झाली आहे. त्यामुळे समान कार्यक्रम घेऊन जर प्रादेशिक पक्ष पुढे येणार असतील, तर त्यांचे स्वागत करायला हवे. त्यासाठी लवकरच सर्व राज्यांतील समविचारी पक्षांची बैठक घेणार आहोत,'' असे शरद पवार यांनी आज सांगितले. 

लोकांना पर्याय हवा आहे. परंतु, कोणताही एक पक्ष तो पर्याय देईल, अशी अवस्था आज नाही. समान कार्यक्रमावर एकत्र येऊन काही पर्याय देण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकेल, असा विश्‍वास लोकांमध्ये व जाणकारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच लोक महाराष्ट्राकडे बघत आहेत, असे पवार म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

Mumbai Local: पावसाचा हाहाकार! सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने

Latest Marathi News Update: आंबेनळी घाट महिनाभर बंद, स्थानिकांचा विरोध

मृत्यूपूर्वी धर्मेंद्र हेमा मालिनी यांना काय म्हणाले होते? अभिनेत्रीचा खुलासा; सांगितलं ते गेल्यानंतर कसं राहतंय कुटुंब

Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंचा दणका! आता किराणा दुकानांतून सुटे खाद्यतेल अन् विनालेबल फरसाण गायब; व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT