Sharad Pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

कोळशाचे १४०० कोटी थकवले सांगता, GST च्या ३५ हजार कोटींचं काय? - शरद पवार

सामान्य माणसाला त्याची झळ बसतेय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

दीनानाथ परब

मुंबई: "सामान्य लोकांचे प्रश्न वाढतायत. पेट्रोल-डिझेलच्या (petrol) किंमती दररोज वाढत आहेत. असं कधी घडलं नव्हतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमती वाढत असल्याचं केंद्राकडून (central govt) सांगण्यात येतं. सहा महिन्यापूर्वी किंमती खाली आल्या होत्या. पण केंद्राने किंमती कमी केल्या नाहीत. पेट्रोल हे सरकारी उत्पन्न वाढवण्याचं साधन आहे. हा दृष्टीकोन भाजपा (bjp) सरकारने स्वीकारला आहे. केंद्राला सर्वसामान्यांविषयी आस्था नाही" अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोळसा प्रश्नावर म्हणाले...

"महाराष्ट्राचा विद्युतपुरवठा तीन प्रकारचा आहे. कोळशापासून वीज, धरणाच्या पाण्यापासून वीज आणि औष्णिक वीज निर्मिती होते. वीजेचे दर कमी करावेत ही राज्य सरकारची भूमिका आहे. कोळशाच्या किंमती कमी करण्याचा आग्रह झाला. आज केंद्र सरकारचे त्या खात्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांची मत मांडली. महाराष्ट्र सरकारकडून कोळशाची ३ हजार कोटी रुपये रक्कम आलेली नाही. ती थकबाकी आहे. त्यामुळे केंद्राला अडचणीला सामोरं जावं लागतय, असं ते म्हणाले. मी माहिती घेतली ३ हजार कोटीचं देणं आहे हे खरं आहे. १४०० कोटी रुपये देण्याची व्यवस्था मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी केली आहे. ती रक्कम आज किंवा उद्या जाईल. महाराष्ट्राकडून कोळशाची किंमत द्यायला १० ते १२ दिवस उशीर झाला. म्हणून केंद्राचे मंत्री महाराष्ट्र सरकारवर आरोप करतात. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रातून केंद्राने जीएसटीची ३५ हजार कोटीची रक्कम वसुल केली. ते ३५ हजार कोटीचं येणं बाकी आहे. ते काही महिन्यांपासून दिलेलं नाही. एकाबाजूला ३५ हजार कोटींची महाराष्ट्राची रक्कम थकवली आहे. महाराष्ट्र सरकारवर असं दोषारोप करणं योग्य नाही" असं शरद पवार म्हणाले.

आज या देशात सीबीआय, ईडी, एनसीबी आणि आयकर खातं या यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. "सीबीआयला कारवाई करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. जे सरकार केंद्र सरकारच्या विचारांचं नाही, जिथे भाजपाचं सरकार नाही, त्या सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. माजी पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर काही आरोप केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार मुख्यमंत्री आणि माझ्याकडे केली. या तक्रारीपोटी अनिल देशमुखांना सत्तेपासून दूर करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता ते आयुक्त कुठे आहेत? गृहमंत्र्यांवर आरोप करणार पोलीस आयुक्त कुठे गायब आहेत? त्यांचा पत्ता नाही" अशा शब्दात त्यांनी नाव न घेता परमबीर सिंग यांचा समाचार घेतला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा गैरवापर होतोय हे सांगताना त्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी, अनिल परब यांची उदहारणे दिली.

नवाब मलिक यांच्या जावयाबद्दल काय म्हणाले....

एनसीबीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे शरद पवार म्हणाले. "नवाब मलिक राज्याचे मंत्री आहेत. त्यांच्या जावयाला अटक केली. नवाब मलिकांनी केंद्राच्या विरोधात भूमिका मांडली म्हणून त्यांच्या जावयावर कारवाई केली" असे शरद पवार म्हणाले. "नवाब मलिकांच्या जावयावर कारवाई करताना ज्या वस्तु सापडल्या, त्या जामिनाचा निकाल लागला. नवाब मलिक यांच्या जावयाकडे सापडलेली वस्तू गांजा नव्हती, वनस्पती होती. म्हणून जामीन मंजूर केल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एनसीबीच्या नावाने उद्या कोणाच्या खिशात काही टाकलं, तुम्च्याकडे ते सापडलं. त्यावर बंदी असेल असा निष्कर्ष काढला, तर सहा ते आठ महिने तुरुंगात काढावे लागणार, हा सत्तेचा गैरवापर आहे" असे शरद पवार म्हणाले.

"एकनाथ खडसे भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीत आले. ते २० वर्षापेक्षा जास्त काळ विधिमंडळाचे नेते होते. ते राष्ट्रवादीत येताच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खटले सुरु झाले" याकडे पवारांनी लक्ष वेधलं. 'मी पुन्हा येणार' म्हणणारे, अस्वस्थ आहेत, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला. "उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. उद्धव ठाकरे यांचा हात मी हातात घेतला आणि उंचावला. मी म्हटलं हेच मुख्यमंत्री होतील" असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. "हे सरकार हरणार नाही. हे सरकार पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. हे सरकार जनतेचा आशिर्वाद घेऊन पुन्हा सत्तेवर येईल" असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. "फडणवीसांना सत्तेशिवाय चैन पडणार नाही. टीका, टिप्पणी करतान तथ्यही शोधावेत. विरोधकांना सत्ता नसल्याचं दु:ख आहे" असा टोला शरद पवारांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT