Sharad-Pawar-Uddhav-Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा'वर; सरकार वाचणार की...

मागच्यावेळी सरकार वाचवण्यासाठी शरद पवारांची मध्यस्थी यशस्वी ठरली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर राज्यातील घडामोडी ढवळून निघालेले असताना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यानंत अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले असून, पवारांसोबत सुप्रिया सुळे यांच्यासह जितेंद्प आव्हाड हेदेखील वर्षावर दाखल झाले आहे. दरम्यान, या बैठकीत पवार आणि ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी ज्यावेळी सरकारवर गडांतर आले होते त्यावेळी ते वाचवण्यासाठी शरद पवारांनी मध्यस्थी करत हे सरकार पडण्यापासून वाचवले होते. त्यामुळे याहीवेळी शरद पवार संकटमोचक ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Sharad Pawar Uddhav Thackeray News In Marathi)

फेसबुक संवादाता काय म्हणाले उद्धव ठाकरे

मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 साली जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडुन आली ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.

मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली.

एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले CM ठाकरे

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नकोय तर काय करायचं, गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती. मी त्यांना आपलं मानतो ते मानतात का नाही ते मला माहित नाही असेही ते म्हणाले. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे असे काहीजण म्हणत आहेत, मी काय वेगळं केलं. प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले, ती शिवसेना देखील बाळासाहेबांच्या नंतरची आहे हे लक्षात ठेवा असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले. मी शस्त्रक्रियेमुळे, आजारी असताना सर्वांशी संवाद ठेवणं शक्य नव्हते असे देखील त्यांनी यावेळी मान्य केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG : प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा खरा मानकरी मी नाही... Sanju Samsonने विजयाचे श्रेय दिले दुसऱ्याला, मन जिंकणारे विधान; म्हणाला, तो नसता तर मी इथे उभा नसतो

ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

T20 WC, IND vs ENG SF: टीम इंडिया फायनलमध्ये! २२ वर्षीय जेकब बेथलची कडवी झुंज अपयशी, ८ मार्चला जेतेपदासाठी न्यूझीलंडला भिडणार

Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Pune News : भाजप नगरसेवकांच्या निर्णयामुळे केंद्राच्या प्रकल्पाला अडथळा, ८ कोटींचा निधी परत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT