ajit pawar poliical news  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेसमध्ये राजकीय भुकंप! अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा दावा

रोहित कणसे

राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदची शपथ घेतली. या बंडानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात हलचालींना वेग आला आहे.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याचे पाहायला मिळले. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील राजकीय भुकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या विधाणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रसमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसचे काही नेते अजित पवार यांच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा देखील प्रवेश होईल, असा दावा मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केलं आहे. अजित पवार गटात असलेले अनिल पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामध्ये अनिल पाटील यांचा देखील समावेश होता. शपथविधीनंतर पाटील यांनी जळगावात कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.

यावेळी बोलताना काँग्रेसचे अनेक आमदार-खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर एकनाथ खडसे यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत यावं, आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कोणत्याही नेत्याला आम्ही तोच मान सन्मान देवू, असं अनिल पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT