Sharad Pawar Ajit Pawar Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : राजकारणात बेरीज करायची असते, भागाकार-वजाबाकी होऊ नये म्हणून..; 'साहेब-दादा' भेटीवर काय म्हणाले जयंत पाटील?

पक्षातील फूट टाळण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, पण त्याला यश आलेले नाही - जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार-अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीबाबत पाटील यांनी हा खुलासा केला.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून हा घरातील वाद घरातच संपावा, याच भावनेतून प्रयत्न करत आहे; पण त्याला आजघडीला मात्र यश आलेले नाही. वादाचा न्यायनिवाडा झाला नाही, तर आयोगाकडून नक्कीच होईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केले.

शरद पवार-अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भेटीबाबत पाटील यांनी हा खुलासा केला. महाविकास आघाडी खंबीर आणि एकसंध आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालयाच्या भूमिपूजनासाठी श्री. पाटील सांगलीत आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार (Sharad Pawar)-अजित पवार यांच्या भेटीबाबत ते म्हणाले, ‘‘राजकारणात बेरीज करायची असते. भागाकार, वजाबाकी होऊ नये, याची दक्षता पक्षाच्या अध्यक्षांनी घ्यायची असते. पक्षातील फूट टाळण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. पक्षातील अनेकजण प्रयत्नशील आहेत; पण त्याला यश आलेले नाही. शरद पवार यांची भूमिकाही स्पष्ट आहे.’’

भाजप प्रवेशाबाबत श्री. पाटील म्हणाले, ‘‘माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. मध्यंतरी भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या; पण असा पक्ष बदलता येतो का. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. लोक बोलत असतात.’’

तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्याबाबत श्री. पाटील म्हणाले, ‘‘महात्मा गांधी यांच्याबद्दल ७५ वर्षांनंतर वक्तव्य करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. निवडणुका जवळ आल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अनेकांना कामे वाटून दिली आहेत. जातीय तेढ निर्माण होऊन संघर्ष व्हावा, असा अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याचे वाटते.’’

कळवा रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू गंभीर प्रकार

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या रुग्णालयाकडे आधी बघावे. त्यात सुधारणा कराव्यात. ते नक्कीच ही बाब गांभीर्याने घेतील, असा टोला श्री. जयंत पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT