NCP Crisis jitendra awhad ajit pawar old video allegation on election commission latest political news  
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही... जितेंद्र आव्हाड यांचा लाव रे तो व्हिडिओ!

NCP Crisis Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

रोहित कणसे

NCP Crisis Latest News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे. अजित पवार यांचा गट हाच खरा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्ष असल्याचे सांगत आयोगाने ‘घड्याळ’ हे पक्ष चिन्ह देखील त्यांना दिले आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावेळी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गट आणि निवडणूक आयोगाने शरद पवारांना संपवण्याचा कट केल्याचा आरोप केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा जुना व्हिडीओ दाखवत निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कालचा निर्णय वाचल्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. अजित पवारांची निवड चूकीची आहे असं स्पष्ट केलं आहे. या निकालात २०१९ साली अजित पवार फुटले तेव्हापासून वाद सुरू झाला असं म्हटलंय. काका मोठ्या मनाचे होते म्हणून २०१९ ला फुटल्यानंतर पुन्हा कुशीत घेतलं. परत बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उपमुख्यमंत्री केला. मग वाद कुठला?

अजित पवार जर माफी मागत साहेबांच्या पायाशी गेले, तर त्यांना माफ करणं हे साहेबाचं मोठं मन आहे. मग निवडणूक आयोग २०२९ कडे का जात आहे? कारण त्यांच्या लक्षात आलं आहे जर ३० तारखेचं पत्र ग्राह्य मानलं तर ही पक्षविरोधी कृत्य होतं, यापासून वाचण्यासाठी म्हणून निवडणूक आयोगाने २०१९ चा मार्ग घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला काहीही अर्थ उरला नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही...

दुसरे पर्याय दिले नाहीत याबद्दल निवडणूक आयोग खोटं बोलत आहे. हा निर्णय फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता, ८४ वर्षाच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. जो माणून मरणाची प्रार्थना करू शकतो तो काहीही करू शकतो असा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना नाव न घेता लगावला.

संजय कोण?

२०१९ पासून वाद असल्याचे निवडणूक आयोग म्हणतं आहे. मग सुनिल तटकरे यांनी आपल्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याचे, प्रफुल्ल पटेल यांनी कार्याध्यक्ष होण्याचे आभार मानले . अजित पवारांचे शरद पवार यांच्याबद्दल ट्वीट आहेत. मग इलेक्शन कमीशनला कोणत्या 'संजय'ने कानात सांगितलं की २०१९ पासून वाद आहेत, असा सवालही आव्हाडांनी विचारला.

लाव रे तो व्हिडीओ...

आम्हाला काहीही अपेक्षा नाहीत. आम्ही कुठल्याही न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आमच्याकडे सगळे व्हिडीओ आहेत, असं म्हणत माध्यमांच्या समोर आव्हाडांनी अजित पवारांचा जुना व्हिडीओ लावून दाखवला.

या व्हिडीओमध्ये अजित पवार शिवसेनेत झालेल्या फूटीवर भाष्य करताना दिसत आहेत. ते म्हणतात की, "तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं. ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, सर्वदूर पोहचवला त्यांचाच पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं, हे जरी निवडणूक आयोगाने दिलं असलं..."

आमच्याकडे सर्व व्हिडीओ आहेत आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत. इलेक्शन कमीशनने कट करून शरद पवारांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. याला कारणीभूत अजित पवार आणि गँग आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT