NCP split Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : पक्षातील फुटीनंतर शरद पवार गटाचं सुप्रीम कोर्टात पाऊल; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना...

After the split in the party, Sharad Pawar's group moved to the Supreme Court...

संतोष कानडे

नवी दिल्लीः शुक्रवारी निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या नाव आणि पक्षचिन्हासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केलीय.

गुरुवारी सुनावणीच्या एक दिवस अगोदर दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक बोलावली होती. या बैठकीला २४ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. विधीमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असल्याचे पुरावे यावेळी एकत्रित करुन पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यात आले.

निवडणूक आयोगातील सुनावणीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलीय. राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना कराव्यात, यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आलीय.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी याचिका जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. या प्रकरणात कारवाई करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना द्याव्यात, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलीय.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, असं शरद पवार वारंवार सांगत आहेत. पक्षसंघटना ताकदीने आपल्यामागे उभी आहे, असं त्यांचं मत आहे. त्यानुसार आता पुरावे एकत्रित करुन निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात येणार आहेत. शक्रवारी दुपारनंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT