Maharashtra Inflation Rate 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Inflation Rate : केंद्रानंतर राज्यातही महागाईत वाढ! राष्ट्रवादी म्हणाली, "सरकार गतीमान, दरवाढ वेगवान"

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Inflation Rate: मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. १ एप्रील २०२३ पासून टोल दरात वाढ करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

एक तारखेपासून मुंबई-पुणे या द्रुतगती मार्गावरून (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी तब्बल १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली आहे. 

अधिवेशन संपताच गतीमान सरकारने दरवाढीचा शॉक देण्याचा वेगवान निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच राज्यातील गतीमान सरकारने सुपरफास्ट गतीने दरवाढीचा सपाटा लावून महागाई वाढवणाऱ्या वेगवान निर्णयांचा धडाका लावला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

राष्ट्रवादीने ३ मुद्दे मांडले आहेत -

  1. राज्यात एक एप्रिलपासून वीज अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता असल्याने ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे.

  2. एक एप्रिलपासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे टोल दरात तब्बल १८ टक्यांनी वाढ होणार असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे.

  3. तर आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांच्या किमतीमध्येही १ एप्रिलपासून १० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्यांना जगणेही मुश्कील करायची तयारी सरकारने केलेली दिसते.

अर्थसंकल्पात वारेमाप घोषणांची खैरात करून अधिवेशन संपल्या-संपल्या सर्वसामान्यांच्या खिशातच हात घालून त्यांचे खिसे रिकामे करायची सरकारची गतीमानता खरंच थक्क करणारी आहे. त्यामुळे सरकार गतीमान, दरवाढ वेगवान असे म्हणत महागाई झेलण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रसने ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT