Dhananjay Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची बॅनरबाजी; 50 फुटी पोस्टरची रंगली चर्चा!

धनजंय मुंडे अपघातातून बरे झाल्यानंतर पहिल्यांदा परळीत जाणार

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी नगरी सजली आहे. दीड महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांचा परळीत अपघात झाला होता. यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. या अपघातातून धनंजय मुंडे सुखरूप बचावले आहेत. उद्या धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळीतील अपल्या मतदारसंघात दाखल होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी परळी शहरात ५० फुटी बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टरची चर्चा सध्या रंगली आहे.

‘टायगर अभी जिंदा है’, अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तर परळी शहरातील प्रत्येक प्रवेश द्वाराच्या कमानीला सजवण्यात आले आहे. दुपारी साडेबारा वाजता गहिनीनाथ गडावर दर्शन करून धनंजय मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वैजनाथ मंदिर, गोपीनाथ गड येथे दर्शन झाल्यानंतर त्यांचं ठीक ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. या स्वागतानंतर त्यांची जाहीर सभा होईल. रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे केरळ आणि तिरुपती बालाजी इथून बँड पथक, मुंबईतून ढोल पथक मागविण्यात आले आहे.

जवळजवळ 40 दिवसानंतर ते पहिल्यांदाच परळीत जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंग स्वागत करण्याची तयारी केली आहे. उद्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे तब्बल 40 दिवसानंतर परळीत येत असून त्यांचे अभुतपुर्व जल्लोषात जंगी स्वागत होणार आहे. त्याचबरोबर शहरात रॅली काढल्यानंतर सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा देखील होणार आहे.

उद्या धनंजय मुंडे हे हेलिकॉप्टरने गहिनीनाथ गडावर नतमस्तक होतील, दुपारच्या दरम्यान ते परळीत आईंची भेट घेऊन प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेत गोपीनाथ गडावर दिवंगत गोपीनाथराव मुंडेंच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार आहेत. त्यानंतर त्यांची ईटके कॉर्नर ते मोंढा मैदान स्वागत रॅली निघणार असून त्यानंतर मोंढा मैदान येथे जाहीर सभा असणार आहे.

दरम्यान आपला नेता परळीत दाखल होत असल्याने मुंडेंच्या चाहत्यांकडून जंगी स्वागताची तयारी सुरू आहे. उद्या कुठं सत्कार तर कुठं पेढे तुला होणार असून याच मुंडेंच्या स्वागतासाठी लावलेल्या, "टायगर अभि जिंदा है...टायगर इज बँक" नावाचे बॅनरची जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT