Praful Patel 
महाराष्ट्र बातम्या

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

Praful Patel on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणालेत की, 'प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ही कोणता मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाला विरोध या एकाच कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली.' एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी हा दावा केला आहे.

सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व जात असल्याने शरद पवार यांच्यामध्ये अस्वस्थता होती. सोनिया गांधी यांचे सल्लागार शरद पवार यांचं महत्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. पी.ए. संगमा हे उघडपणे सोनिया गांधी यांच्या विदेशी ओळखीबाबत टीका करायचे. आपण त्यांचे नेतृत्व स्वीकारू शकत नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे हा विरोध संगमा यांच्यापासून सुरु झाला. त्यानंतर अनेक नेत्यांनी यात खतपाणी घालण्याचं काम केलं, असं पटेल म्हणालेत.

सोनिया गांधी यांच्याविरोधात गुप्त बैठका देखील झाल्या आहेत. पी.ए. संगमा, शरद पवार, जितेंद्र प्रसाद, संतोष मोहन देव, प्रेमरंजन दास मुंशी, राजेश पायलट या नेत्यांनी गुप्ता बैठका घेतल्या. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमधून बाहेर पडू पाहणाऱ्या नेत्यांसाठी म्हणून नव्या पक्षाचा विचार सुरु झाला, असं ते म्हणाले.

जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा पी. ए. संगमा, शरद पवार, तारिख अन्वर, मी स्वत: राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालो. पण, जितेंद्र प्रसाद आणि राजेश पाटलट यांनी माघार घेतली. त्यांची राष्ट्रवादीत येण्याची इच्छा होती. पण, त्यांना वाटलं की ते स्वत:च्या जीवावर मतदारसंघात निवडून येऊ शकणार नाही. त्यांना काँग्रेसच्या नावाची आवश्यकता वाटली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस नवा पक्ष असल्याने लोकांमध्ये पोहोचण्यास वेळ लागेल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला, असं पटेल म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यामुळे कोणत्याही वेगळ्या कारणासाठी नाही, तर सोनिया गांधी यांना विरोध म्हणून राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी पुस्तक लिहून त्यात मोठे गौप्यस्फोट करेन असं म्हटलं होतं. त्यातीलच हा एक भाग असल्याचं म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Sonika Yadav Video: सात महिन्यांची गर्भवती जिद्दीने उभी राहिली! वेटलिफ्टिंग स्पर्धेत १४५ किलो भार उचलून जिंकले पदक

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

SCROLL FOR NEXT