Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच; जयंत पाटलांनी केले भाकित

धनश्री ओतारी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच असे भाकित राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या भाकितानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.(NCP Jayant Patil CM Eknath Shinde Devendra Fadnavis Shivsena)

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, लवकरच पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भातील याचिकांची सुनावणी होणार आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटलांनी मोठे वक्तव्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच! आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

2024 ला पुन्हा निवडणूक लढतो आणि पुन्हा सत्ते येतो, असे भाजपने म्हटले असते तरी लोकांनी त्यांना स्विकारलं असतं. पण आता महाविकास आघाडीचं सरकार पाडून शिंदे गटाला सोबत घेत सत्तेत बसलेलं लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील. असही जयंत पाटील म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं तेव्हा कोट्यावधींच्या देवाणघेवाण झाली. हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला पटेल, रुचेल असं वाटत नाही. शिंदेगटालील आमदारांचं पुढच्या टर्मला निवडूण येणं कठीण आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT