Devendra Fadanvis vs Jayant Patil
Devendra Fadanvis vs Jayant Patil esakal
महाराष्ट्र

Jayant Patil : पुढच्या वर्षी आम्ही फडणवीसांना सरप्राईज देणार; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

संतोष कानडे

मुंबईः २०२४मध्ये आम्ही अनेक राजकीय धक्के देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जशास-तस प्रत्युत्तर दिलं आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का?, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "२०२४ पर्यंतचे सर्व आश्चर्य संपले आहेत. शिंदे आणि आम्ही २४ मध्ये अनेक राजकीय धक्के आम्ही देऊ. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची ग्रोथ थांबली होती. ती ग्रोथ आम्हाला वाढवायची आहे. सरकारवर आम्हाला लक्ष ठेवायचे आहे."

हेही वाचाः ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

'एबीपी माझा'च्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. त्याच कार्यक्रमामध्ये दुपारच्या सत्रात जयंत पाटील म्हणाले की, २०२४ मध्ये आजच्याप्रमाणे निराशाजनक चित्र नसेल. लोकं हुशार असतात. आपण ज्याला मत दिली तो सध्या कुठंय, हे ते पाहतील. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. देवेंद्र फडणवीस यांना २४मध्ये मोठं सरप्राईज असेल, असं जयंत पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या मतदारसंघात जावून मी कधीही राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणू म्हणालेलो नाही. शिवसेनेचं एक वैशिष्ट्य आहे. जे लोक त्यांना सोडून जातात ते पुन्हा निवडून येत नाहीत. सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे. त्याचा फायदा नक्कीच होईल, असं पाटील म्हणाले.

माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं षड्यंत्र- फडणवीस

मातोश्रीचे दरवाजे त्यांनी माझ्यासाठी बंद केले. मी नाही. मी त्यांना बऱ्याचदा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही. या अडीच वर्षात या सरकारने माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच टार्गेट त्यांनी त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलं होतं. माझं कोणाशी वैर नाही. मी कोणाशीच राजकीय वैर धरत नाही. आजही त्यांच्याशी वैर नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो. सरकार चालवतो. त्यांनी फोन नाही उचलला. त्यांनी दार बंद केली. हे त्यांनी केलं की इतर कोणी केलं माहीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात आज बाईक रॅली

SCROLL FOR NEXT