NCP on Chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP: 'अरे बापरे चक्क चंद्रकांत दादांनी महात्मा फुले जयंती दिनी शुभेच्छा दिल्या'; राष्ट्रवादीचा खोचक टोला

रुपेश नामदास

Mahatma Phule Jayanti 2023 : आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. सत्यशोधक, स्त्री शिक्षणाचे जनक, एक मोठे समाजसेवक होते. मात्र जयंती वरून राष्ट्रवादी-भाजपच्या नेत्यांमध्ये ट्विटर वॉर चालू झालं आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चद्रकांत पाटील यांनी ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कॅप्शन दिलं आहे की, "थोर समाजसुधारक,भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती! महाराष्ट्राला कृतीशील असा वैचारीक वारसा देणाऱ्या आणि कुप्रथेच्या गर्तेतील भारतीय समाजासाठी समतेची पहाट आणणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!"

या ट्विटचा धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी चद्रकांत पाटलांवर निशाना साधला आहे. मिटकरी यांनी ट्विट करत म्हटंल आहे की, "अरे बापरे चक्क चंद्रकांत दादांनी महात्मा फुले जयंती दिनी शुभेच्छा दिल्यात, वाह क्या बात है? "देर आये दुरुस्त आये!" तुमच्या व्हीडिओ मध्ये "सर्व साक्ष जगद्गपती lत्यासी नकोची मध्यस्थी" हा फुलेंचा अखंड आलाय, याचा अर्थ समजुन घेतला तरी आपण जयंतीच्या मनापासून शुभेच्छा दिल्यात असे समजू!

चंद्रकांत पाटील यांचं फुले-आंबेडकर, कर्मवीर यांच्या विषयी वादग्रस्त विधान

चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर याबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या होत्या चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत हे विधान केलं होतं. दरम्यान पाटील यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT