Amol Kolhe Esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe: अमृता खानविलकर सोबत लग्नाची अफवा नेटकऱ्यांनी घेतली सिरीयस; कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे

सकाळ डिजिटल टीम

खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे लक्ष असते. काल (1 एप्रिल) रोजी अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी लिहलेली पोस्ट काय आहे?

अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्रामधील बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार असल्याचं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे.

या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, 'हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!' अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या या पोस्टला कमेंट केली आहे. अमृता खानविलकरने 'हे काय आहे', अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यानी अमोल कोल्हेंच्या पोस्टवर कमेंट केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी लिहलेली पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधरित पोस्ट शेअर करत असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 840K इतके फॉलोवर्स आहेत.अमोल कोल्हे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT