Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर पुन्हा एकदा अडचणीत

सकाळ डिजिटल टीम

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा असून यावेळी एका 40 वर्षीय महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (रविवारी) रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. मी मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी गेले असता जितेंद्र आव्हाड यांनी वेगळया हेतून स्पर्श करत बाजूला सरकवल असा आरोप महिलेने केला आहे.

याआधी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव हा मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान वर्तक पोलिसांनी याप्रकरणी त्यांना अटक केली होती. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला होता.

दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत मी आमदारकीचा राजीनामा देतो असंही त्यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT