Congress on Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: मविआच्या सभेआधी हालचालींना वेग; राष्ट्रवादीचा बडा नेता मुंबईला रवाना

नागपुरात मविआची सभा होणार असून या सभेपूर्वी हालचालींना वेग आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाविकास आघाडीच्या नागपूरमधील सभेआधी हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचा बडा नेता मुंबईला रवाना झाल्याची माहीती आहे.

नागपुरात मविआची सभा पार पडणार आहे. मात्र या सभेपूर्वी हालचालींना मोठा वेग आला आहे. मविआच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख मुंबईला रवाना झाले आहेत. नागपुरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेच्या स्थळाची पाहणी आज अनिल देशमुख हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत करणार होते. मात्र पहाणी रद्द करून अनिल देशमुख मुंबईला रवाना झाले आहेत.

अनिल देशमुख मुंबईला का गेले याचं कारण अस्पष्ट आहे, मात्र महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे आता मविआमध्ये समन्वयाचा अभाव आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

दरम्यान नागपुरामध्ये होणारी महाविकास आघाडीची सभा विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे. पूर्वी या सभेला भाजपने विरोध केला होता. भाजपकडून सुरू असलेल्या विरोधामुळे ही सभा चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ही सभा चर्चेत आली आहे. सभेपूर्वी मविआचे नेते सुनील केदार, विनायक राऊत यांनी या मैदानाची पहाणी केली होती. आज अनिल देशमुख या मैदानाची पहाणी करणा होते. मात्र त्यापूर्वीच अनिल देशमुख मुंबईला रवाना झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

तर या सभेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असा प्रश्न समोर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

Pune Vande Bharat New: वाल्ह्यात वंदे भारत एक्स्प्रेस तीन तास ठप्प, रेल्वे कर्मचाऱ्यांची माणुसकी, नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT