Chhagan Bhujbal esakal
महाराष्ट्र बातम्या

आमचं आरक्षण कमी होणार नाही; बांठिया आयोगावर भुजबळ स्पष्टचं बोलले

'मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्री आणि मंत्रिमंडळावर आता आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्री आणि मंत्रिमंडळावर आता आरक्षण टिकवण्याची जबाबदारी आहे.'

मागासवर्गीय समाजाला (OBC) राज्यात आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या बांठिया आयोगानं (Banthia Commission) त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केलाय. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होत आहे. या सुनावणी पूर्वीच आयोगानं त्यांचा अहवाल सादर केलाय.

ओबीसींची लोकसंख्या ४० टक्क्यांपर्यंत असल्याचा निष्कर्ष काढून माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या आयोगानं २७ टक्के आरक्षणास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांच्या आसपास असल्याचं मानलं जात असताना प्रत्यक्षात ती कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याचे संकेत आहेत. दरम्यान, राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीची (OBC) संख्या आणि राजकीय मागासलेपण यावर आधारित जयंतकुमार बांठिया यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केलाय.

या अहवालावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाराजी व्यक्त केलीय. ते म्हणाले, जनगणनेच्या माध्यमातून राज्यातील ओबीसींची जनगणना करावी, यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत आमचं आरक्षण कमी होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्री आणि मंत्रिमंडळावर आता आरक्षण टिकवण्याची जबाबदारी असल्याचं स्पष्ट मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. आयोगाच्या आकडेवारीमुळं ओबीसी समाजात संताप व्यक्त केला जात असल्याचंही ते म्हणाले. यावेळी भुजबळ यांनी विविध मुद्यांवरही भाष्य केलं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं हे जे सरकार आहे, ते केंद्र सरकारपेक्षा हुशार निघालंय. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून इतर वस्तुवरील GST वाढवला आहे. म्हणजेच अंगावरचे सर्व कपडे काढून घेतले आणि लांगोटी दिली असा हा प्रकार झालाय, असा टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावलाय. भारत सरकारच्या विरोधात मी काय बोलणार, सगळे शब्द असंसदीय झाले तर खासदारांना नवीन शब्द शोधावे लागतील, असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT