Dhananjay Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडे आहेत तरी कुठे? नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राज्यात सध्या पक्षांतरांचे वारे वाहू लागले आहेत. तर अजित पवार यांच्या पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चेनंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.

दरम्यान धनंजय मुंडे हे काल देखील संभाजीनगरला जाऊन आले आहेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबतची माहिती 'साम' या वृत्तवाहिनीने दिली आहे.

धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्रतच्या बाहेर आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असताना. दुसरीकडे धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Political News)

धनंजय मुंडे तडका फडकी मुंबईला रवाना झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच धनंजय मुंडे यांचे दोन्ही नंबर बंद असल्याने या राजकीय घडामोडीचे गूढ वाढलं आहे. या संपूर्ण घटनेमुळं येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT