Sharad Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: 'शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी 'ते' देव पाण्यात ठेवून बसले होते', जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

जयंत पाटलांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदवरून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे तर्क वितर्क लावले जात होते. अशातच काल शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घेतली यावर राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

काही जण पवारांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते असं पाटील म्हणालेत. राज्यात शरद पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या निर्णयाने एक वादळ निर्माण झालं. तर बरेच लोक देव पाण्यात ठेवुन बसले. जे होत आहे ते तसंच चालत राहू दे. राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढली आहे. ते नसते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. कोणते लोक आहेत जे शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेत यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

शरद पवार यांनी २ मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती. तिथल्या तिथेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. कोणी रडत होत, कोणी आरडाओरड करत होतं तर कोणी घोषणा देत होतं. त्यामुळे या निर्णयावर विचार करण्यासाठी पवारांनी तीन दिवसांचा वेळ मागितला होता.

तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतच ठाण मांडून होते. अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती आहे. शिवाय देशभरातून अनेक पदाधिकाऱ्यांनी फेरविचार करुन सध्या तरी तुम्हीच पदावर राहावं, अशा विनवण्या केल्या.

काल शरद पवारांनी वाय. बी. सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांची नावं चर्चेत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT